Poet Composer Login Lyrics catalog Who we are?

Who we are?

 

आम्ही कोण?

आम्ही कोणी तरबेज कवी किंवा जाणकार संगीतकार नाही. जमेल तशा कविता लिहितो आणि मराठी गाणी मनापासून ऐकतो. पण,एवढं नक्की कि मराठी कविता आणि गाणी ह्यांच्यावर मनापासून प्रेम करतो....ज्या दिवशी एखादी छान कविता वाचली किंवा नवीन गीत ऐकलं कि आमचा दिवस छान जातो.

दुस-यांच्या कविता आणि गाणी खूप ऐकली आहेत, तेवढीच ती एन्जॉयही केली आहेत. आता स्वतःच्या कविता आणि स्वतःची गाणी ऐकवूयात ...नुसती कल्पनाही मस्त वाटते ना ? हेच आम्हालाही  वाटलं आणि ठरवलं असाच एक घाट घालायचा. त्यातूनच "काव्य झाले गाणे" ह्या संकल्पनेचा जन्म झाला.

चला तर मग आपल्या नवीन प्रवासाला सुरवात करुया.

 

Join your own KZG family.


Click here.