कवी मित्रहो,
शब्दांना कल्पनेची साथ असेल तर त्याची कविता बनते. प्रत्येकाच्या मनात एक तरी कविता असतेच. काहीजण ती शब्दात उतरवतात...तर काहीजण मनाशीच गुणगुणतात. ज्यांना शब्दांची साथ लाभलिये अशा प्रत्येक कवीच्या मनातील सुप्त इच्छा, 'माझ्या कवितेचं गाणं होईल का?' ,पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत " काव्य झाले गाणे ". हे साध्य करण्यासाठी तुमच्या कविता आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्यांना स्वरबध्द करून सुंदर आवाजातील गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवू.
तुमच्यासाठी....
- तुमच्या कवितेचं गाणं
- तुमच्याच शब्दांचं खुललेलं सौंदर्य
-
गाण्याचे गीतकार असल्याचा आनंद
आता व्यक्त करा दिलखुलास भावना…घ्या एक मोकळा श्वास…टाका पाहिलं पाऊल क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी…घ्या उंच भरारी आकाशाला मुठीत सामावण्यासाठी.
Join your own KZG family. This is nice!
