प्रश्नसंच आणि त्यांचे समाधान
सामान्य प्रश्न
प्र. काव्य झाले गाणे काय आहे ?
उ. - कवी आणि संगीतकार यांना प्रथमच एकत्र आणणारे ऑनलाईन व्यासपीठ.
- कवींना गीतकार बनण्याचा आनंद देणारे ठिकाण.
- संगीतकारांना छंदातून अर्थार्जन करण्याची दुर्मिळ संधी देणारे वरदान.
- मराठी प्रेमींसाठी वैविध्यपूर्ण भाव दडलेल्या कवितांचं भव्य दालन.
प्र. काव्य झाले गाणे कसे वापरावे ?
उ. अरे वाह, क्या बात है !! अस कधीही म्हणावं वाटलं तर www.kavyazalegane.com उघडावं. कवींनी कविता अपलोड कराव्यात. रसिकांनी त्या एन्जॉय कराव्यात. संगीतकारांनी त्यांची गाणी बनवून कवींच्या अकाऊन्टमध्ये पाठवावीत. बस्स, इतक सरळ सोप्पं आहे हे! सगळं ऑनलाईन!
प्र. काव्य झाले गाणे वर उपलब्ध असणा-या सर्व कविता वाचता येतील का ?
उ. www.kavyazalegane.com च्या सर्व सदस्यांना ही सुविधा अगदी मोफत उपलब्ध आहे.
प्र. बनलेल गाणं नेमकं कोणाचं ?
उ. कविता कवीची आणि संगीत संगीतकाराचे.
प्र. गाण्याचा व्यावसायिक वापर करता येईल का?
उ. ते नक्कीच शक्य आहे. पण बनलेलं गाणं हे कवी व संगीतकार ह्या दोघांचं आहे. त्यामुळे तसा विचार असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला पुरेपूर मदत करु.
प्र. मी सगळे प्रश्न वाचले,पण मला अजून काही प्रश्न आहेत, मी काय करावं ?
उ. छान वाटलं ऐकून. म्हणजे लवकरच तुमच्याशी संपर्क होण्याचा योग आहे.
आम्हाला प्रश्न पाठवा. Feedback mechanism वापरा.
आम्हाला फोन करा. Click Contact us
कवी
प्र. काव्य झाले गाणे वरील कवी होण्यासाठी काय करावं लागेल ?
उ. संकेतस्थळावर रजिस्टर करा, नंतर कवी म्हणून प्रोफाईल निवडा.
प्र. एक गाणं बनवण्यासाठी कवीला साधारणतः किती खर्च येईल ?
उ. साधारणतः खर्च पंच्याहत्तर डॉलर्स येवू शकेल, परंतु वेबसाईटच्या नुतनिकरणाप्रित्यर्थ PROMOTIONAL OFFER द्वारे मर्यादित कालावधीसाठी ही सुविधा आपणास उपलब्ध आहे फ़क्त पंधरा डॉलर्स (15 USD) मध्ये. त्वरा करा !! संधीचा लाभ घ्या !!, दुस-या शब्दात सांगायचे तर 'सारं काही अगदी आपल्या बजेटमध्ये '.
प्र. कवीने payment कधी व कसे करावे ?
उ. तुम्हाला
संगीतकाराकडून गाणं बनवण्याची विनंती येईल. तुम्ही तिचा स्वीकार करू शकता आणि payment
ह्याच वेळी करायचं आहे. आम्ही
तुमच्या सुरक्षिततेचं महत्व
जाणतो आणि म्हणूनच आम्ही आमच्या उपभोक्त्यांसाठी जगातील सर्वात आघाडीच्या आणि सुरक्षित payment gateway
चा वापर करीत आहोत.परंतु सध्या
काही तांत्रिक कारणामुळे online payment ची सुविधा उपलब्ध नाहीये. त्यामुळे offline payment स्वीकारण्यासाठी system मध्ये तात्पुरते आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.आम्ही
आपल्याशी आवश्यक तेव्हा संपर्क साधून ह्या बद्दल सविस्तर माहिती देऊच. लवकरच online
payment ची सुविधा परत उपलब्ध
करण्याचा प्रयत्न करत आहोत.
खूप खूप धन्यवाद .
संगीतकार
प्र. काव्य झाले गाणे वरील संगीतकार होण्यासाठी काय करावे लागेल ?
उ. संकेतस्थळावर रजिस्टर करा, नंतर संगीतकार म्हणून प्रोफाइल निवडा.
प्र. संगीतकाराला किती कवितांना चालबद्ध करण्याची मुभा आहे ?
उ. संख्येवर मर्यादा नाही.
प्र. संगीतकारांसाठी अर्थार्जनाचे प्रयोजन कसे काय?
उ. जेव्हा तुम्ही संगीतकार म्हणून ह्या संकेतस्थळावर काम करण्याची इच्छा दर्शवाल, तेव्हा आम्ही तुमचा प्रोफाइल पाहून तुमच्याशी संपर्क साधू.
